शारदीय नवरात्रीनिमित्त सुलतानपुरात महारक्तदान शिबीर उत्साहात संपन्न; ७५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!


सुलतानपूर(गावकरी टाइम्स/विशेष प्रतिनिधी):
शारदीय नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 'अमित मंत्री मित्र परिवार' आणि 'देसाई हॉस्पिटल, सुलतानपूर' यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महारक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी देसाई हॉस्पिटल येथे पार पडलेल्या या शिबिरात तरुण आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.  


"रक्तदान हेच श्रेष्ठदान" या उदात्त भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी लोकमान्य ब्लड बँक, छत्रपती संभाजीनगर यांच्या वैद्यकीय पथकाने विशेष सहकार्य केले व रक्त संकलनाचे काम चोख पार पाडले.  

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अमित मंत्री, डॉ. आमिर शेख, डॉ. वसंता देसाई, जय देसाई, दिलीप सुरुषे, नागेश भोसले, मंगेश खेत्रे आणि पवन भानापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्सवाच्या काळात निव्वळ उत्सव साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे आलेल्या सर्व ७५ रक्तदात्यांचे आणि आयोजकांचे सुलतानपूर परिसरामध्ये सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments