जिल्हास्तरीय स्पर्धेत मोहम्मद सोहेल उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्याची उत्तुंग भरारी; मोहम्मद शादाब जाणार उमराहला!


सुलतानपूर (गावकरी टाइम्स/मोईन खान):
लोणार येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय भव्य ‘क्विझ सिरत-उन-नबी २०२६’ स्पर्धेत सुलतानपूर येथील मोहम्मद सोहेल उर्दू हायस्कूल व मोहम्मद हनीफ सौदागर उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या शाळेत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी मोहम्मद शादाब मोहम्मद शमशुद्दीन याने घवघवीत यश संपादन केले आहे. या गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल त्याची पवित्र उमराह यात्रेसाठी निवड करण्यात आली आहे.


जिल्ह्यातील १,४०० विद्यार्थ्यांमधून तालुकास्तरावर अव्वल कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल शाळेचे अध्यक्ष व प्राचार्य आमेर अहेमद मोहम्मद आरिफ सर, संस्थेचे सर्व सन्माननीय कार्यकारी मंडळ सदस्य, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने मोहम्मद शादाबचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले व पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments