बुद्धीच्या बळावर मारली बाजी! डॉ. आर. एन. लाहोटी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुका क्रीडा स्पर्धेत देदीप्यमान यश

सुलतानपूर(गावकरी टाईम्स वृत्तसेवा)::
येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत डॉ. आर. एन. लाहोटी सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना मात देत विजय मिळवला असून, तब्बल १६ विद्यार्थ्यांची आगामी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


यशस्वी खेळाडूंची नामावली

१४ वर्षे वयोगट: वेदिका बुळे, आराध्य घुले, अनुश्री पोपळे, आनंद देशमुख, अवंती दायमा, लक्षित राजपुरोहित, डॅरेन लाड, अमित हजबे, सुरज नागरे आणि प्रणित सरदार.
१७ वर्षे वयोगट: श्रुती सोनुने, गायत्री घुगे, ऋतुजा घुगे, निश्रा खिवसरा, गौरी अग्रवाल आणि डेरिअस लाड.
विद्यार्थ्यांच्या या यशात क्रीडा शिक्षक दिगंबर डोळस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अचूक रणनीती आणि नियमित सरावामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.

खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. हेमराज लाहोटी, शाळेचे प्राचार्य तुषार येरपुडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. क्रीडा क्षेत्रात शाळेचा नावलौकिक उंचावणाऱ्या या सर्व गुणी खेळाडूंचे परिसरातून अभिनंदन होत असून जिल्हास्तरीय स्पर्धेतही ते अशीच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments