दुसरबीडचा नाशिकमध्ये डंका! प्रा. गजानन देशमुख यांना 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार'

दुसरबीड (गावकरी टाइम्स/इसराईल शेख):
"शिक्षक घडवतो समाज आणि समाज घडवतो देश. चांगला शिक्षक हा केवळ अभ्यासक्रमातील विषय शिकवत नाही, तर विद्यार्थ्यांचे संपूर्ण आयुष्य घडवण्याचे कार्य करतो," या उक्तीची प्रचिती देत दुसरबीड (ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) येथील प्रा. गजानन विठ्ठलराव देशमुख यांना मानाच्या 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा'ने नुकतेच नाशिक येथे सन्मानित करण्यात आले.


रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता नाशिक येथील दिंडोरी रोड, म्हसरुळ भागातील 'जीवक स्कूल ऑफ नर्सिंग' (भाग्यलक्ष्मी कॉम्प्लेक्स) येथे हा दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडला.

हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रालयाचे मुख्य सचिव मा. श्री. सुनील चव्हाण यांच्या शुभहस्ते प्रा. देशमुख यांना प्रदान करण्यात आला. "शिक्षकाचा सन्मान म्हणजे साक्षात ज्ञानाचा सन्मान असतो," असे गौरवोद्गार या वेळी मान्यवरांनी काढले.

सोहळ्यातील प्रमुख उपस्थिती

मा. श्री. सुनील चव्हाण – मुख्य सचिव, कृषी मंत्रालय, महाराष्ट्र राज्य (हस्ते पुरस्कार प्रदान)
मा. श्री. प्रविण जाधव – नगरसेवक, नाशिक महानगरपालिका
मा. श्री. संजय जाधव – माजी संगणक विभाग प्रमुख (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) तथा चेअरमन, जीवक स्कूल ऑफ नर्सिंग
मा. श्री. चंद्रकांत बनकर – अध्यक्ष
श्री. शिवाजी राजे जाधव – प्रमुख उपस्थिती
मा. श्री. सुशील देशमुख व मा. श्री. अभिजीत पाटील – विशेष अतिथी

प्रा. गजानन देशमुख यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या प्रदीर्घ योगदानाची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय बहुमान देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील एका ध्येयवादी शिक्षकाला राज्यस्तरावर मिळालेल्या या सन्मानामुळे दुसरबीडसह संपूर्ण सिंदखेड राजा तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments