बीबी येथील गजानन आत्माराम साळवे २५ ऑगस्टपासून बेपत्ता कुटुंबीयांकडून नागरिकांना शोधासाठी सहकार्याचे आवाहन


बिबी ता. लोणार(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):बिबी येथील रहिवासी गजानन आत्माराम साळवे हे दिनांक २५ ऑगस्ट २०२६ पासून बेपत्ता झाले
 आहेत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला; मात्र अद्याप त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत असून, नागरिकांनी त्यांचा शोध घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


या बाबत पोलिस स्टेशन बिबी येथे तक्रार दिली आहे
या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठे आढळून आल्यास तातडीने ९५११९७४७३५ / ९१५६३००९५२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments