मेहकर ते डोणगाव मार्गावर नागापूरजवळील पुलाजवळ कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात घडला असून, यामध्ये दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डोणगाव येथील रहिवासी असलेले हे दोन तरुण दुचाकीवरून मेहकरहून आपल्या घराकडे परत निघाले होते. दरम्यान, नागापूर फाट्याजवळील पुलाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये दोघांचाही जागीच अंत झाला.
मृतकांची नावे:
शेख साकिब कुरेशी
शेख साहिल
घटनेनंतर दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. अपघाताची वार्ता समजताच ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दोन्ही तरुण गरीब कुटुंबातील असून, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या या अचानक आणि दुर्दैवी जाण्याने डोणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


0 Comments