राज्य सरकारने मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR 2026) कामात सहभागी असणाऱ्या ERO (मतदार नोंदणी अधिकारी) आणि AERO (सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी) म्हणून काम पाहणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. SIR 2026 च्या कामात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ मंजूर करण्यात आली आहे.
वार्षिक मानधनात भरीव वाढ
शासनाकडून मिळालेल्या मान्यतेनुसार, या कामात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांना आता खालीलप्रमाणे वार्षिक मानधन दिले जाणार आहे:
ERO अधिकारी: वार्षिक ३०,००० रुपये मानधन मंजूर.
AERO अधिकारी: वार्षिक २५,००० रुपये मानधन मंजूर.
अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण आणि नोंदणीचे काम अत्यंत जबाबदारीचे व शिस्तीचे असते. शिक्षणाधिकारी व शिक्षक वर्गावर शैक्षणिक कामांव्यतिरिक्त या कामाचा अतिरिक्त ताण असतो. मात्र, शासनाने या कामाची दखल घेत मानधनात वाढ केल्यामुळे ERO आणि AERO म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

0 Comments