BIG BREAKING!मेहकर न्यायालयात खळबळ! १० हजारांची लाच घेताना 'बेलीफ' ACB च्या जाळ्यात रंगेहाथ!


मेहकर (गावकरी टाईम्स/प्रतिनिधी):
दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात स्थावर मालमत्ता जप्तीचे वॉरंट न बजावण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना बेलीफ जगदीश सुखदेव राऊत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. ही धडक कारवाई आज, गुरुवारी मेहकर बसस्थानक परिसरात करण्यात आली.


नेमकं काय घडलं?

आरोपी: जगदीश सुखदेव राऊत (वय ३१, रा. माळीपुरा, सिंदखेडराजा) — वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, मेहकर येथे 'बेलीफ' म्हणून कार्यरत.
मागितलेली लाच: एका ५३ वर्षीय शेतकरी/तक्रारदाराविरुद्ध न्यायालयात दिवाणी दावा सुरू होता. जप्तीचे वॉरंट न बजावता ते परत करण्यासाठी बेलीफ राऊत याने सुरुवातीला १५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
ACB कडे तक्रार: लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (बुलढाणा) कडे धाव घेतली.

असा रचला सापळा!

आज ६ ऑगस्ट रोजी दुपारी तक्रारीची पडताळणी केली असता, तडजोडीअंती १०,००० रुपये लाच स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले. त्यानंतर लगेचच ACB च्या पथकाने मेहकर बसस्थानक परिसरात सापळा रचला.
तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच बेलीफ जगदीश राऊत याला पथकाने रंगेहाथ ताब्या घेतला.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

या प्रकरणी पोलीस स्टेशन मेहकर येथे आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाई करणारे पथक:

ही कारवाई भागोजी चोरमले (पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश पवार (पोलीस निरीक्षक), तसेच पोलीस अंमलदार शैलेश सोनवणे, पंढरी शेळके आणि नितीन शेटे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments