BREAKING NEWS | सुलतानपूर-जालना मार्गावर भीषण अपघात: ऑटो रिक्षा विजेच्या खांबावर आदळली; एका वृद्धाचा मृत्यू, अनेक जखमी


सुलतानपूर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
सुलतानपूर ते जालना रस्त्यावर सुलतानपूर ते भानापूर दरम्यान आज एक भीषण रस्ता अपघात घडला. उदनापूर येथून सुलतानपूरकडे जाणाऱ्या एका ऑटो रिक्षावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा थेट रस्त्याशेजारील विद्युत खांबावर जाऊन जोरदार आदळली. या भीषण अपघातात एका ७० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.


अपघाताचा संक्षिप्त तपशील:

मृताचे नाव: भगवान शामराव मुळे (वय ७० वर्षे, रा. उदनापूर)
घटनास्थळ: सुलतानपूर ते भानापूर दरम्यान (सुलतानपूर-जालना रस्ता)
अपघाताचे कारण: ऑटो रिक्षावरील चालकाचे नियंत्रण सुटून थेट विजेच्या खांबावर आदळल्याने अपघात घडला.

जखमींवर तातडीने उपचार सुरू

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऑटो रिक्षा उदनापूरहून सुलतानपूरच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. यामध्ये भगवान मुळे यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

या अपघातात इतर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. अपघातानंतर श्रीराम हॉस्पिटल च्या रुग्णवाहिकेतून आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी श्रीराम हॉस्पिटल सुलतानपूर व मेहकर आणि  उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments