गजानन महाराजांच्या पालखी स्वागतासाठी सुलतानपूर सज्ज; ग्रामपंचायत व पोलिसांच्या पुढाकाराने रस्ते झाले चकाचक


सुलतानपूर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
श्री संत गजानन महाराज यांची पालखी उद्या, १४ ऑगस्ट रोजी सुलतानपूर नगरीमध्ये दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर, पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा आणि वारकरी व ग्रामस्थांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे.


ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून गावात विशेष स्वच्छता व अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली, ज्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पालखी मार्गावर असलेल्या अडथळ्यांची दखल घेत, प्रशासनाने गावातील प्रमुख रस्ते मोकळे केले आहेत. यामध्ये मेहकर रोड, लोणार रोड आणि जालना रोडवरील रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवण्यात आले आहे. तसेच, रस्त्यांवरील खड्डे बुजवून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे. यामुळे पालखी जाण्यासाठी रस्ता पूर्णपणे मोकळा आणि सुस्थितीत झाला आहे.

या मोहिमेत पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव, हेडकॉन्स्टेबल शिवानंद केदार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील नागरे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पांडे, ग्रामविकास अधिकारी नंदकिशोर तेजंकर, पोलीस पाटील राजेश भानापुरे, ग्रा.पं सदस्य पुत्र आमिर भाई, ग्रामपंचायत कर्मचारी भिकाजी भानापुरे, मारोती अवचार आणि गावातील अनेक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन अपार मेहनत घेतली. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे आणि नियोजनामुळे पालखीच्या स्वागतासाठी सुलतानपूर नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments