जिल्हा बँकेत हायव्होल्टेज निकाल! डॉ. संजय रायमुलकरांचा मोठा विजय; ज्ञानेश्वरदादा पाटलांनीही मारली बाजी!


बुलढाणा(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): :
बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणूक निकालांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत असून निकालांचा धडाका सुरू झाला आहे. ताज्या कलांनुसार अनुसूचित जाती मतदारसंघातून 'सहकार पॅनल'चे डॉ. संजय रायमुलकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे सहकार पॅनलने चौथ्या जागेवर शिक्कामोर्तब करत निवडणुकीत आघाडी घेतली असून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.


दुसरीकडे, नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातून स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या या विजयाने परिवर्तन पॅनलने बँकेत आपला दुसरा झेंडा फडकवून विरोधकांना जोरदार टक्कर दिली आहे.
दोन्ही बाजूंनी विजयाचे खाते एकापाठोपाठ उघडले जात असल्याने जिल्हा बँकेच्या सत्तेचे चित्र अधिकच रंगतदार आणि उत्कंठावर्धक बनले आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments