बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने एकतर्फी विजय मिळवत जिल्हा बँकेवरील आपली सत्ता कायम राखली आहे. एकूण २१ संचालक पदांपैकी तब्बल १९ जागांवर सहकार पॅनलने बाजी मारली असून, विरोधी 'स्व. अजित पवार शेतकरी परिवर्तन पॅनल'ला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
या निवडणुकीत १२ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या आणि त्या सर्व १२ जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले होते. उर्वरित ९ जागांसाठी झालेल्या प्रत्यक्ष निवडणुकीत सहकार पॅनलने ७ जागा जिंकल्या, तर शेतकरी परिवर्तन पॅनलला फक्त २ जागांवर विजय मिळवता आला.
सहकार पॅनलचे विजयी उमेदवार:
इतर सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघ: सुनील तजाराम उंदडकर
इतर मागास वर्ग राखीव मतदारसंघ: गोविंदराव गणपत मिरगे
प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, संग्रामपूर: श्रीकांत दादाराव मारोडे
महिला राखीव मतदारसंघ: पुष्पाबाई रामदास बासकर
महिला राखीव मतदारसंघ: अस्मिता प्रदीप डेलगे
अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ: संजय भास्करराव रायमुलकर
प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, लोणार: गोविंद शेषराव मापारी
शेतकरी परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार:
नागरी सहकारी बँक/वैयक्तिक सभासद प्रतिनिधी मतदारसंघ: ज्ञानेश्वर पाटील (काँग्रेस प्रणित)
सोसायटी मतदारसंघ, मलकापूर: शिवचंद्र तायडे (भाजप प्रणित)
शिंगणे-जाधवांच्या नेतृत्वावर मतदारांची पुन्हा एकदा मोहर
माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने ही भक्कम कामगिरी करून दाखवली. दुसरीकडे, आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी परिवर्तन पॅनलचा प्रभाव मर्यादित राहिला असून खुद्द कायंदे यांच्या पॅनलमधील प्रमुख उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निकालाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब केले आहे.

0 Comments