ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर सुलतानपूर येथे सर्वधर्मीय समाजबांधवांच्या उपस्थितीत शांतता सभा अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडली. या सभेला उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) संतोष खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
महापुरुषांचे विचार आणि सामाजिक ऐक्य हीच खरी ताकद: संतोष खाडे
उपस्थितांना मार्गदर्शन करताना संतोष खाडे म्हणाले की, "सर्वधर्मीय बांधवांचे ऐक्य ही आपल्या परिसराची खरी शान आहे. प्रत्येकाने आपल्या महापुरुषांच्या आणि आदर्शांच्या विचारांचे आचरण केले तर एक आदर्श समाज निर्माण होईल. सण-उत्सव साजरे करताना इतर घटकांच्या भावनांचा आदर राखल्यास सामाजिक सलोखा अधिक घट्ट होतो." याशिवाय सध्याच्या काळात मोबाईलचा वाढता गैरवापर टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहन
मेहकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनीही शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यावर भर दिला. सण-उत्सवांमध्ये बंधुभाव आणि परस्पर सौहार्द जपणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्थानिक प्रतिनिधी शेख चांद, शेख खाजा आणि शेख अबरार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती
या शांतता सभेला तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेश पिंपरकर, मनोहर भानापुरे, शेख खाजा, शेख चांद, शिवप्रसाद जोगदंड, शेख अमीर, सुभाष खेत्रे,शेख खाजा शेख अख्तर, शेख अक्तर, शंकर निलक, शेख जमीर, पत्रकार शेख चांद आणि शेख इम्रान यांच्यासह सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक व नेटके सूत्रसंचालन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर पनाड यांनी केले. सभेच्या यशस्वी नियोजनासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार, राजेश जाधव व पोलीस अंमलदार पांडे यांनी परिश्रम घेतले.

0 Comments