BIG BREAKING: मेहकर हादरले!अर्धे बाळ पोटात, अर्धे बाहेर... तरी सरकारी दवाखान्याचे दरवाजे बंदच!


मेहकर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर शहरात सरकारी आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी संतापजनक घटना घडली आहे. ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर, एका गर्भवती मातेला प्रसूतीकळा असह्य झाल्याने भररस्त्यातील ओट्यावर बाळंत व्हावे लागले. नवजात बाळ अर्धे बाहेर आणि अर्धे अडकलेल्या अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या स्थितीत असतानाही सरकारी रुग्णालयातील डॉक्टर ड्युटीवरून गायब होते, तर कर्तव्यावर असलेल्या नर्सने बाहेर येण्यास चक्क नकार दिला.


नेमकी घटना काय?

अचानक प्रसूतीवेदना: सकाळी ६ च्या सुमारास एका स्थानिक कुटुंबातील गर्भवती महिलेला अचानक कळा सुरू झाल्या. घरात मदतीला कोणी नसल्याने ती एकटीच चालत ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली.
रुग्णालयाबाहेरच कोसळली: रुग्णालयाचे प्रवेशद्वार अवघ्या ५० मीटरवर असताना वेदना असह्य झाल्याने ही महिला रस्त्यावरील ओट्यावर कोसळली. तिथेच बाळाचा काही भाग बाहेर येऊन आई व बाळाचा जीव धोक्यात आला.
सरकारी यंत्रणेची निगरगट्ट भूमिका: स्थानिक नागरिक योगेश सौभागे यांनी तात्काळ धाव घेऊन रुग्णालयातील स्टाफ नर्सला मदतीची विनंती केली. मात्र, "डॉक्टर हजर नाहीत, मी एकटी बाहेर येऊ शकत नाही," असे सांगत नर्सने हात वर केले.

खासगी मदतीमुळे वाचले प्राण

सरकारी व्यवस्थेने नाकारल्यानंतर, सौभागे यांनी तातडीने एका खासगी रुग्णालयातील नर्सला बोलावले. परिसरातील महिलांच्या मदतीने भररस्त्यावरच ती अत्यंत जोखमीची प्रसूती यशस्वी करण्यात आली. त्यानंतर तातडीने माता आणि नवजात बालकाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
जनतेचा संताप आणि सवाल
ज्या शहराचे प्रतिनिधित्व देशाचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री करतात, त्याच शहरात सरकारी रुग्णालयाची ही दुरवस्था असेल, तर ग्रामीण महाराष्ट्रात जनतेने कुणाच्या भरवशावर जगायचे? नाईट ड्युटीवर असणारे डॉक्टर नेमके कुठे गायब होते? या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मेहकरकरांनी केली आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments