सुलतानपूरमध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा; पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन



सुलतानपूर(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
भारताचे माजी पंतप्रधान, प्रखर राष्ट्रभक्त आणि 'भारतरत्न' श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुलतानपूर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमादरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या देशाच्या विकासातील, पायाभूत सुविधांच्या उभारणीतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुत्सद्देगिरीतील योगदानाचे स्मरण करण्यात आले. भारताला अणुशक्ती संपन्न बनवणे, खेड्यापाड्यांना रस्त्यांनी जोडणारी 'प्रधानमंत्री ग्रामसडक योजना' सुरू करणे आणि देशात सुशासनाची पायाभरणी करण्यात अटलजींचे योगदान अद्वितीय असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

मान्यवरांची उपस्थिती

या अभिवादन कार्यक्रमास परिसरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
श्री. मारोतराव रा. सुरुशे (महामंत्री, भाजपा किसान मोर्चा, बुलढाणा जिल्हा)
श्री. विजय मापारी (जिल्हा उपाध्यक्ष)
श्री. गजानन मापारी (तालुका अध्यक्ष)
श्री. गणेश तांगडे (सोशल मीडिया जिल्हा संयोजक)
यांच्यासह राजू भाऊ पिंपरकर, दामोधर कुडके, विनोद सराफ, पद्माकर बोराळकर, ज्ञानेश्वर शेवाळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी अटलजींच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता झाली.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments