लोणार केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची बहुप्रतिक्षित नवीन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे. या निवडीनंतर नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांवर विविध स्तरातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
ई.सी. मेंबर: श्री. चंदणभाऊ दरोगा
जिल्हा संघटक: श्री. सुमित बोरा
तालुका अध्यक्ष: श्री. पंजाब शिंदे
तालुका उपाध्यक्ष: श्री. शरद मापारी
तालुका सचिव: श्री. मयूर शिरसाट
तालुका कोषाध्यक्ष: श्री. संतोष सानप
शहर अध्यक्ष: श्री. रिजवान जड्डा
शहर उपाध्यक्ष: श्री. प्रवीण नागरे
शहर सचिव: श्री. सदाभाऊ जायभाये
या नवीन कार्यकारिणीच्या निवडीसाठी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. नंदूभाऊ मापारी (बॉस), श्री. कैलासभाऊ बचाटे, श्री. अप्सर सेठ, श्री. शीतलजी बोरा, श्री. मुरलीभाऊ शेटे, श्री. मनोजी जोगड, श्री. वासिफभाई तसेच तालुक्यातील सर्व ज्येष्ठ फार्मासिस्ट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध:
केमिस्ट व फार्मासिस्ट बांधवांच्या विविध समस्या, व्यवसायाशी संबंधित अडीअडचणी सोडवणे तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी ही नवीन कार्यकारिणी कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस लोणार परिसरातील फार्मासिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

0 Comments