राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) युवक आघाडीच्या वतीने आयोजित 'युवा जोडो संकल्प अभियान' अंतर्गत वाशिम जिल्हा युवा संवाद दौरा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या बैठकीत पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी वाटचालीच्या दृष्टीने वाशिम जिल्हा कार्यकारणी व युवक आघाडीच्या विविध पदांवर नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
या महत्त्वाच्या बैठकीला रासपचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश सचिव दीपक तिरके आणि प्रदेश कार्यकारणी सदस्य नामदेव कुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर व प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
🔹 जाहीर झालेल्या नूतन नियुक्त्या:
जिल्हा कार्यकारणी:
जिल्हाध्यक्ष (वाशिम): श्री. अजयसिंह राजूरकर
अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष (वाशिम): श्री. शेख शफी शेख लतीफ (वाकद, ता. रिसोड)
महिला जिल्हाध्यक्ष (वाशिम): सौ. शशिकला तारक
जिल्हा उपाध्यक्ष (वाशिम): श्री. महादेव शिंदे
युवक आघाडी कार्यकारणी:
युवक जिल्हाध्यक्ष (वाशिम): श्री. मंगेश बोरकर
युवक जिल्हा संपर्क प्रमुख (वाशिम): श्री. गणेश लाभाडे
युवक तालुकाध्यक्ष (रिसोड): श्री. अक्षय गिरी
युवक तालुकाध्यक्ष (मालेगाव): श्री. योगेश घुगे
पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत नेण्याचा निर्धार
या बैठकीत बोलताना मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, "राष्ट्रीय समाज पक्षाची सर्वसमावेशक विचारसरणी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. नवनियुक्त पदाधिकारी पक्षशिस्त पाळून पक्षविस्तारासाठी जोमाने कार्य करतील."
नियुक्ती पत्र प्रदान केल्यानंतर उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते व हितचिंतकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानत पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.


0 Comments