लोणारला मिळाले नवे, खंबीर नेतृत्व: मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी शेख सुलतान शेख मुख्तार!

लोणार (गावकरी टाइम्स/फिरदोस खान):
मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्या लोणार (जि. बुलढाणा) तालुका अध्यक्षपदी शेख सुलतान शेख मुख्तार यांची नुकतीच अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक सलीम सारंग यांच्या हस्ते शेख सुलतान यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


शेख सुलतान यांच्या सामाजिक कार्याची आणि समाजसेवेतील योगदानाची दखल घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संघटनेच्या नियमावलीनुसार आणि राष्ट्रीय मूल्यांशी बांधील राहून सामाजिक सलोखा, सर्वसमावेशकता आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते कार्य करतील, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

प्रमुख उपस्थिती:

या नियुक्तीपत्र वितरण सोहळ्याप्रसंगी संघटनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते:
प्रा. डॉ. रिझवान उल्लाह खान (महाराष्ट्र वर्किंग प्रेसिडेंट, मुस्लिम वेलफेअर असोसिएशन)
सय्यद इकबाल (जिल्हाध्यक्ष, मुस्लिम वेलफेअर असोसिएशन)
रफीक भाई (साखरखेर्डा तालुकाध्यक्ष, मुस्लिम वेलफेअर असोसिएशन)

आपल्या नियुक्तीबद्दल शेख सुलतान यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून, लोणार तालुक्यात संघटनेचा विस्तार करणे आणि सर्वसामान्य व गरजू घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

या निवडीबद्दल शेख सुलतान यांचे विविध स्तरातून, मित्रपरिवार व समाजबांधवांकडून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments