समृद्धी महामार्गावर टायरचा 'बॉम्ब' फुटला; स्कॉर्पिओ हवेत उडून पलटी, १० प्रवासी जखमी!सिंदखेडराजा रुग्णालयात उपचार सुरू


सिंदखेडराजा(गावकरी टाइम्स/गुलशेर शेख):
समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांचे अपघात सत्र सुरूच असून नागपूर कॉरिडॉरवर आज सकाळी एका भीषण अपघातात स्कॉर्पिओ कार पलटी झाली. मागचे टायर अचानक फुटल्याने झालेल्या या अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक असून अन्य ९ जण जखमी झाले आहेत.


कसा घडला अपघात?

छत्तीसगड येथील राजनांदगावचे रहिवासी असलेले १० तरुण नाशिकहून नागपूरच्या दिशेने स्कॉर्पिओ कारने (क्रमांक CG 08 BC 4405) प्रवास करत होते. सकाळी ११:३० च्या सुमारास चॅनल क्रमांक ३२५.३ जवळ गाडी पोहोचली असता, अचानक कारच्या मागील डाव्या बाजूचे टायर मोठ्या आवाजात फुटले. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ महामार्गावरच जोरदार पलटी झाली.

अपघाताचा तपशील व जखमींची स्थिती:

गंभीर जखमी: अमन साहू (वय २५, छत्तीसगड)
किरकोळ जखमी: चालक हेमंत विश्वकर्मा (वय २४), तीकेस बंदे, रवी साहू, यश साहू, देवेश साहू, वासू साहू, विकी साहू, किशन विश्वकर्मा आणि नवीन साहू.

तातडीने मदतकार्य आणि वाहतूक सुरळीत

अपघाताची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर सीआरओच्या सूचनेनुसार समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे पोलीस पथक अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक अनिता इर्शीद यांच्या नेतृत्वाखालील पथक, एमएसएफ (MSF) आणि क्यूआरव्ही (QRV) जवानांनी तात्काळ बचावकार्य हाती घेतले.
सर्व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सिंदखेडराजा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त स्कॉर्पिओ क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून दुसरबीड टोलनाका येथे हलवण्यात आली असून, महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात आली आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments