उपमुख्यमंत्री सुनेत्री पवार यांच्यावर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या अत्यंत खालच्या स्तरावरील ‘गुंगी गुडिया’ या वैयक्तिक टीकेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यात उमटत आहेत. या वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच नेते आणि कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले असून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत.
दरम्यान, लोणार येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला हाणले जोडे; तीव्र घोषणाबाजी
लोणार शहरातील मुख्य चौकात जमा झालेल्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या या कृत्याचा आणि वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातामध्ये "हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध!" असे फलक धरून कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला तीव्र रोष व्यक्त केला. महिलेचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा असा अवमान अजिबात सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी उपस्थित नेत्यांनी दिला.
आंदोलनात 'या' प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:
या धडाकेबाज निषेध आंदोलनात लोणार तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये:
अंबादास पाटील (लोणार तालुका अध्यक्ष)
भगवानराव सानप (माजी सभापती)
सुलतान शेख (लोणार तालुका अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग)
तौफिक कुरेशी (लोणार शहर अध्यक्ष)
इब्राहिम सर
मोसिन खान (अल्पसंख्याक शहर अध्यक्ष, लोणार)
तौसीफ भाई (बुलढाणा जिल्हा सचिव)
विठ्ठल पाटील आठवडे (लोणार तालुका कार्याध्यक्ष)
यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
"महिलांचा अपमान करणाऱ्या आणि राजकीय पातळी सोडून टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा जनता आगामी काळात नक्कीच समाचार घेईल," असा इशारा आंदोलक पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिला.

0 Comments