BIG BREAKING! छत्रपती संभाजीनगर आगाराच्या बसचा भीषण अपघात; टिप्परचा अक्षरशः चुराडा, चालक जागीच ठार


चिखली( गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
चिखली-खामगाव महामार्गावरील बोरगाव वसू फाट्यानजीक आज सायंकाळच्या सुमारास एसटी बस आणि भरधाव टिप्परमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात टिप्परचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, केबिनमध्ये अडकल्याने टिप्पर चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.


अपघाताचा थरार आणि वाहनांचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर आगाराची बस (छत्रपती संभाजीनगर - देऊळगाव राजा - जालना - चिखली - खामगाव मार्गे अकोला) जात असताना बोरगाव वसू फाट्याजवळ समोरून येणाऱ्या टिप्परची (क्रमांक MH 28 AB 8228) आणि बसची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की टिप्परचा दर्शनी भाग मधोमध फाटून पूर्णपणे चुराडा झाला.
अपघातातील प्राथमिक तपशील:
मृतक (टिप्पर चालक): सचिन वाघ (वय अंदाजे, रा. संभाजी नगर, चिखली)
टिप्पर मालक: बाळू जाधव (रा. हातानी)
एसटी बस चालक: बाळू खेडकर (छत्रपती संभाजीनगर आगार)
पत्रकाराकडून तत्परतेने मदतकार्य
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पत्रकार सय्यद साहिल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी माणुसकीच्या नात्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अपघातात बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून, अपघाताचे नेमके कारण आणि अधिकृत माहिती घेण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments