लोणार (गावकरी टाइम्स/किशोर मोरे ): अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने शाळांकडे आपला मोर्चा वळवला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शाळांमधील अन्नाच्या सुरक्षिततेवर जनजागृत्तीसाठी अन्न व औषध प्रशासन व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक तालुका स्तरावर विशेष कार्यशाळा आयोजित करून मुख्याध्यापकांना धडे दिले जात आहेत.
त्यानुसार दिनांक 25/08/2026 रोजी लोणार तालुक्यातील प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेसाठी पात्र असणाऱ्या 128 शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा सिद्धेश्वर विद्यालय सुलतानपूर येथे घेण्यात आली.
जिल्ह्यातील 13 तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी आणि अधीक्षक यांच्या मार्फत या कार्यशाळा घेण्यात येत आहेत.
याबाबतचे वेळापत्रक प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने निर्गमित केले आहे.
त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री पाटील साहेब व शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. या कार्यशाळेला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी श्री अक्षय भोपाळे साहेब तसेच शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री कुंभारे साहेब सर्व केंद्रप्रमुख, उपस्थित होते. कार्यशाळेला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी श्री अक्षय भोपाळे साहेब, शालेय पोषण आहार अधीक्षक श्री कायंदे उपस्थित होते. दरम्यान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आहार
शिजविताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत देखील स्वयंपाकी आणि मदतनीस यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेता शाळांच्या मुख्याध्यापकांवर विविध जबाबदारी देण्यात आली आहे.
जंक फूडमध्ये पोषण
तत्त्वाचा अभाव
जंक फूड हे विद्यार्थी
आवडीने खातात. मात्र, जंक फूडमध्ये पोषणतत्त्वाचा प्रामुख्याने अभाव आढळून येतो. ते कमी खाल्ल्यावरदेखील शरीरात अतिरिक्त कॅलरी व चरबी जाते. हे पदार्थ तयार करताना अतिप्रक्रिया केली जात असल्याने शरीरासाठी ते अत्यंत घातक ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या कार्यशाळेला अन्न सुरक्षा अधिकारी श्री भोपाळे व गटशिक्षणाधिकारी श्री कुंभारे साहेब यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री भगवान कायंदे साधन व्यक्ती यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संतोष मुंडे सर यांनी केले.

0 Comments