Breaking News: मेहकरमध्ये गुटखा तस्करांच्या अड्ड्यावर मध्यरात्री धाड; एकाला बेड्या..!

मेहकर(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): 
मेहकर तालुक्यात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या काळ्या बाजाराविरोधात एक अत्यंत खळबळजनक कारवाई समोर आली आहे. अमरावती येथील अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) विशेष दक्षता पथकाने मेहकर शहरात धाडसी छापा टाकून तब्बल ५८,५४४ रुपयांचा अवैध गुटखा आणि सुगंधित पान मसाला जप्त केला आहे. 

या कारवाईत ६२ वर्षीय आरोपी युनुसोद्दीन शब्बीरोद्दीन याला राहत्या घरातून अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
१४ जुलै रोजी अमरावतीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला मेहकर येथील 'छोटा इमामवाडा' परिसरात एका घरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्याची पक्की माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने अत्यंत गुप्तता बाळगत मेहकर पोलीस 


स्टेशनच्या सहकार्याने हा छापा टाकला.

अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किर्ता वसावे (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहकर पोलीस ठाण्यात नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५, १२३, ३(५) सह अन्न सुरक्षा कायदा २००६ च्या कलम ५९ आणि २६(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


कारवाईतील प्रमुख अधिकारी व पथक:

मार्गदर्शन: सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, स. द. केदारे (अमरावती विभाग) व ठाणेदार व्यंकटेश आलवार (मेहकर पोलीस)
प्रत्यक्ष कारवाई: अन्न सुरक्षा अधिकारी संदीप सूर्यवंशी (दक्षता), विजय घोंगे, अनुराग चव्हाण (अमरावती)
तपास अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल, प्रदीप राठोड व इतर पोलीस कर्मचारी.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments