महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद उर्दू शाळा, सुलतानपूर येथे भव्य पुस्तक वाटप कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तरुण व धडपडणाऱ्या युवा नेत्यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी जपत हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिक्षण हेच प्रगतीची गुरुकिल्ली असून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाची गोडी लागावी, या उद्देशाने या पुस्तक वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुस्तक वाटप करतानाचा आनंद ओसंडून वाहत होता.
तरुण नेतृत्व अन् सामाजिक बांधिलकीचे दर्शन!
शासकीय व राजकीय वर्तुळात जयंतीनिमित्त सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्याचा उपक्रम तरुण नेत्यांनी हाती घेतला, ही अत्यंत अभिनंदनीय बाब आहे. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन खालील युवा नेत्यांनी केले:
शे. सुलतान शे. मुख्तार (लोणार तालुका अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
शे. लतीफ शे. रहिफ (तालुका सचिव, अल्पसंख्याक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
शेर खान सरदारखान पठाण (शहर अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग, सुलतानपूर)
प्रताप भानपुरे (राष्ट्रवादी नेते)
या कार्यक्रमाला परिसरातील राजकीय, सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवर:
नंदकिशोरतेजनकर(ग्रामसेवक,सुलतानपूर), चांद भाई पत्रकार,सिपारत भाई पैलवान,राजू पठाण पत्रकार, विदर्भकन्या शाहीनताई,शे. मुख्तार भाई,शे. खॉजा शे. उमर,शे.गणि भाई,गफ्फार साहेब,सूरज साठे,जाकीर भाई,अजहर भाई (ग्रामपंचायत सदस्य),अजहर भाई,इनुस पठाण,राजू भाई,शे. वसिम शे. असद, मारोती अवचार.
विशेष आभार
हा कार्यक्रम अतिशय उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल मो. आसिफ मो. लतीफ (प्रिंसिपल, जिल्हा परिषद उर्दू शाळा, सुलतानपूर) तसेच शाळेचा संपूर्ण शिक्षक व कर्मचारी वृंद यांचे आयोजकांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
तरुण नेत्यांनी पुढाकार घेऊन राबवलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक व शिक्षकांनी मनःपूर्वक कौतुक केले आहे.


0 Comments