लोणारसाठी अभिमानास्पद! जमीयत उलेमा बुलढाणा जिल्ह्याला राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार’


लोणार (फिरदोस खान पठाण/प्रतिनिधी):
नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जमीयत उलेमा महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारिणी व व्यवस्थापन समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बुलढाणा जिल्ह्याला उत्कृष्ट संघटनात्मक, धार्मिक आणि सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय 'उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. या निवडक जिल्ह्यांच्या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश झाल्यामुळे आणि त्यात लोणार तालुक्याचे सक्रिय योगदान असल्यामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
दि. ११ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे ही उच्चस्तरीय बैठक अत्यंत उत्साहात पार पडली. या बैठकीला जमीयत उलेमा महाराष्ट्रचे अध्यक्ष हजरत हाफिज नदिम सिद्दीकी साहेब, जनरल सेक्रेटरी मौलाना इब्राहिम कासमी साहेब, दीनी तालीमी बोर्ड महाराष्ट्रचे अध्यक्ष तथा जमीयत उलेमा विदर्भचे जनरल सेक्रेटरी मुफ्ती रोशन शाह कासमी साहेब यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.



सामूहिक परिश्रमाचे फलित: 
ॲड. हाजी मोहम्मद रिझवान जड़ा
बैठकीदरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांच्या धार्मिक, सामाजिक व संघटनात्मक कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते हा राज्यस्तरीय सन्मानचिन्ह व गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार राहिलेले लोणार तालुका अध्यक्ष ॲड. हाजी मोहम्मद रिझवान जड़ा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
"हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील आणि विशेषतः लोणार तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांच्या सामूहिक परिश्रमाचे आणि समर्पित भावनेचे फलित आहे. सर्वांच्या एकजुटीमुळेच आज जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर चमकले आहे."
लोणार तालुक्याची बैठकीस प्रमुख उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीला बुलढाणा जिल्ह्यातर्फे जिल्हाध्यक्ष मौलाना शरीफ साहेब, जिल्हा सरचिटणीस हाफिज झुलरहमान साहेब, मौलाना अब्दुल्ला साहेब यांच्यासोबतच लोणार तालुक्याचे अध्यक्ष ॲड. हाजी मोहम्मद रिझवान जड़ा साहेब, हाफिज राजिक साहेब तसेच जिल्ह्यातील इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड. रिझवान जड़ा यांनी लोणार तालुका व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच, भविष्यातही जमीयत उलेमा लोणार तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात समाजाच्या धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक सेवेसाठी अधिक ताकदीने आणि जोमाने कार्य करत राहील, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्ह्याला आणि लोणार तालुक्याला मिळालेल्या या बहुमानाबद्दल सर्व स्तरांतून जमीयत उलेमाच्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments