स्व. अजितदादा पवार यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली – प्राचार्य व्ही. एम. ठाकूर,साखरखेर्डा येथील एस.ई.एस. हायस्कूलमध्ये जयंती उत्साहात साजरी

साखरखेर्डा येथील एस.ई.एस. हायस्कूलमध्ये जयंती उत्साहात साजरी
साखरखेर्डा (गावकरी टाइम्स/जुबेर शाह)
स्थानिक एस.ई.एस. हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज येथे बुधवार, २२ जुलै रोजी स्व. अजितदादा पवार यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना "स्व. अजितदादा पवार यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देत खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती घडवून आणली," असे प्रतिपादन प्राचार्य व्ही. एम. ठाकूर यांनी केले.


सकाळी ११:३० वाजता आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य ठाकूर पुढे म्हणाले की, "विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी स्व. अजितदादा पवार यांनी घेतलेले कष्ट आणि केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांचा विचार आणि दूरदृष्टी आजही नवीन पिढीसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे."

या कार्यक्रमाला विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रताप पागोरे यांच्यासह प्रमुख उपस्थिती म्हणून मगन रबडे, नितीन पापळकर, अमोल लांबाडे, इमरान सय्यद, प्रताप तघरे, सतीश पोंधे, दर्शन गवई, वैशाली शुक्ल, संगीता चव्हाण, राधा जोशी, माधुरी मोरे आणि उज्ज्वला कुलकर्णी हे उपस्थित होते.

कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांचा आणि आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला. या सोहळ्यास एस.ई.एस. हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments