रिसोड-वाशिम मार्गावर भीषण अपघात; गोहगाव हाडे येथील एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी


रिसोड(गावकरी टाइम्स/सिकंदर शेख):
रिसोड-वाशिम महामार्गावरील सवड गावानजीक असलेल्या साई धाब्याजवळ मंगळवारी (१४ जुलै) संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास एक भीषण दुचाकी अपघात झाला. समोर अचानक बैलगाडी आल्यामुळे झालेल्या या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे गोहगाव हाडे परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश गुलाबराव हाडे (वय ४५, रा. गोहगाव हाडे, ता. रिसोड, जि. वाशिम) असे मृतकाचे नाव आहे. तर समाधान हिम्मतराव निकम (वय ४८, रा. गोहगाव हाडे) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.


अचानक बैलगाडी समोर आल्याने अपघात
राजेश हाडे आणि समाधान निकम हे दोघे मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दुचाकीने रिसोड-वाशिम मार्गावरून जात होते. सवड गावालगत असलेल्या साई धाब्याजवळ त्यांची दुचाकी आली असता, अचानक त्यांच्या समोर एक बैलगाडी आली. वेग मर्यादेत असूनही अचानक समोर आलेल्या बैलगाडीमुळे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीची बैलगाडीला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, राजेश हाडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
जखमीवर वाशिम येथे उपचार सुरू
या अपघातात समाधान निकम हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमी समाधान निकम यांनीच अपघात नेमका कसा झाला, याबाबतची प्राथमिक माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments