लोणार:तौफीक कुरेशी यांची शहराध्यक्षपदी तर तौसीफ अली यांची जिल्हा सचिवपदी निवड! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (बुलढाणा) तर्फे नियुक्तीपत्र बहाल

 
लोणार (गावकरी टाइम्स/फिरदौस खान पठाण):
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटन अधिक मजबूत आणि गतिमान करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये नवीन नियुक्ती सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझिर काझी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार लोणार शहरातील दोन सक्रिय व निष्ठावान कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या जाहीर केल्या आहेत.


या अंतर्गत, लोणार येथील जामा मस्जिद चौक परिसरातील सक्रिय कार्यकर्ते श्री. म. तौफीक हाजी अ. लतीफ कुरेशी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोणार शहराध्यक्षपदी (अध्यक्ष, शहर कार्यकारिणी) नियुक्ती करण्यात आली आहे (पत्र क्र. ७२३/२६). त्यांच्या या निवडीमुळे लोणार शहरात पक्षाची ताकद वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
तसेच, लोणारमधील रोशनपुरा भागातील तरुण व अभ्यासू कार्यकर्ते श्री. तौसीफ अली इस्माईल अली यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सचिवपदी (जिल्हा कार्यकारिणी) नियुक्ती करण्यात आली आहे (पत्र क्र. ७२२/२६). जिल्हा पातळीवर पक्षाचे कार्य वाढवण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
वरिष्ठ नेत्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार:

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझिर काझी यांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. हे नियुक्तीपत्र देताना त्यांनी सांगितले की, पक्ष संघटनेचे कार्य करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री. प्रफुल्लभाई पटेल साहेब, लोकप्रिय प्रांताध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे साहेब आणि जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मा. ना. श्री. मकरंद आबा पाटील साहेब यांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावीत.
पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही नवनियुक्त पदाधिकारी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, अशी खात्री जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केली असून त्यांच्या भावी राजकीय प्रवासास मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीबद्दल लोणार व परिसरातील कार्यकर्त्यांकडून दोन्ही नवनियुक्त नेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments