सुलतानपूर ते अंजनी रोडवर एसटी बस आणि मोटरसायकल दरम्यान झालेल्या एका भीषण अपघातात २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.:
सुलतानपूर ते अंजनी रोडवर एसटी बस आणि मोटरसायकल दरम्यान झालेल्या एका भीषण अपघातात २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड डेपोची 'रिसोड ते नाशिक' धावणारी एसटी बस (क्रमांक MH 14 MT 0873) रिसोडहून नाशिकच्या देशाने जात होती. दरम्यान, अंजनी बाजूकडून येणारी मोटरसायकल (क्रमांक MH 28 CG 1799) आणि या बसची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या भीषण धडकेत मोटरसायकलस्वार आदित्य प्रदीप शेळके (वय २२) हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की, यामध्ये मोटरसायकलचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
पोलिसांची वेळीच मध्यस्थी; तणाव नियंत्रणात
अपघाताची माहिती मिळताच सुलतानपूर पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव व नागरे साहेब यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती आणि काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि वाहतूक सुरळीत केली.
जखमी तरुणाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

0 Comments