पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नाझिया खानवर तात्काळ FIR दाखल करा; लोणारमध्ये मुस्लिम समाज आक्रमक

लोणार (गावकरी टाइम्स/फिरदोस खान पठाण):
सोशल मीडियावर मुस्लिम धर्म, पैगंबर मोहम्मद (स.व.), त्यांच्या पत्नी आणि मुस्लिम समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील भाष्य करून व्हीडिओ व्हायरल करणाऱ्या नाझिया खानवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तीव्र मागणी लोणार येथील मुस्लिम समाजाने केली आहे. या विकृत कृत्याचा निषेध करत २६ जून २०२६ रोजी लोणार पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना जाहीर तक्रार अर्ज देण्यात आला.
तक्रार अर्जात दिलेल्या माहितीनुसार, तथाकथित 'एक्स मुस्लिम' नाझिया इलाही खान ही गेल्या काही काळापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम धर्माच्या श्रद्धास्थानांबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन काल्पनिक आणि बनावट वक्तव्ये करत आहे. तिने तयार केलेले हे आक्षेपार्ह व्हीडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल केले जात आहेत.


सामाजिक सलोखा बिघडवण्याचा डाव

लोणार येथील मुस्लिम समाजाने अर्जात आरोप केला आहे की, नाझिया खान ही दोन समाजांमध्ये जाणीवपूर्वक तेढ आणि तणाव निर्माण करण्याचे कृत्य करत आहे. देशाची सुरक्षा, शांतता आणि सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याच्या कुत्सित हेतूनेच ती असे व्हीडिओ पसरवत असून तिच्या या कृत्याचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध केला जात आहे.

तात्काळ अटकेची मागणी

लोणार येथील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून, संबंधित पोलीस प्रशासनाने या कृत्याची गंभीर दखल घ्यावी, नाझिया खान हिची चौकशी करून तिच्यावर योग्य त्या कडक कलमांनुसार तात्काळ एफआयआर (FIR) दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments