परिस्थितीचे भांडवल न करता संघर्षातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे सुलतानपूर (ता. लोणार) येथील धडाडीचे पत्रकार,दै. सकाळ चे लोणार तालुका प्रतिनिधी तथा साप्ता.अविष्कार चे मुख्यसंपादक सागर पनाड हे महाराष्ट्रराज्यातील अत्यंत प्रभावी पत्रकारांची संघटना असलेल्या 'अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या' बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदि निवड . त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लेखणीचा दबदबा आणि वाचकांचे अथांग प्रेम
पत्रकारितेकडे निव्वळ व्यवसाय म्हणून न बघता 'समाजसेवा' म्हणून पाहणारे सागर पनाड यांच्या वास्तववादी आणि धारदार लेखणीचे असंख्य चाहते आहेत. त्यांनी लिहिलेले लेख, स्तंभलेख आणि गावातील पुरातन इतिहास, देवदेवतांचा इतिहास तसेच सुलतानपूर परिसरातील नामवंत व्यक्तींच्या आयुष्यावर लिहिलेले लेख नेहमीच वाचकप्रिय ठरतात. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील अनेक जटिल समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावल्या आहेत. त्यांच्या लेखणीच्या दबदब्यामुळे प्रशासन आणि शासनालाही अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा लागला आहे.
अत्यंत मनमिळाऊ आणि परिसरातील लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे 'ॲक्टिव्ह' व्यक्तिमत्त्व म्हणून सागर भाऊंची ओळख आहे. सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून ते सर्वपक्षीय नेत्यांपर्यंत आणि सर्वसामान्य जनतेशी मैत्रीपूर्ण संबंध जोडून ठेवले आहेत.
त्यांच्या या महत्वपूर्ण निवडीबद्दल जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

0 Comments