ब्रेकिंग न्यूज: लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! 'मे' महिन्याचा हप्ता या तारखेला जमा होणार; ३४४ कोटींचा निधी मंजूर

बुलडाणा (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
राज्यातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) अंतर्गत मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात मे महिन्याचा प्रलंबित हप्ता लवकरच जमा होणार असून, यासाठी शासनाकडून तब्बल ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
भाजप आमदार मोनिका राजळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या संदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे.


१२ ते १५ जून दरम्यान खात्यात पैसे येणार
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मोनिका राजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता येत्या १२ ते १५ जून दरम्यान जमा केला जाऊ शकतो. निधी मंजूर झाल्यामुळे आणि संभाव्य तारखा समोर आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
१० जून रोजी शासन निर्णय (GR) जारी
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी ३४४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) १० जून रोजी जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आता निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments