सिंदखेडराजा (गावकरी टाइम्स/सय्यद सादीक): आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचा मेळावा सिंदखेडराजा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मेळाव्यात पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच निवडणूक तयारीसंदर्भात विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत बूथ लेव्हल एजंट (BLA) नियुक्ती, मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, गावपातळीवरील संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबविणे तसेच पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी तसेच माजी नगराध्यक्ष देविदासभाऊ ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका आणि विचार सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करून पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला दोन्ही तालुक्यांतील मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.

0 Comments