BIG BREAKING: साखरपुडा एका महिलेसोबत, लग्न दुसरीशी; संतप्त महिलेची पोलिसांत तक्रार!



देऊळगाव राजा (गावकरी टाइम्स/सय्यद सादीक): लग्नाचे आश्वासन देत एका महिलेची फसवणूक केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला असून, याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका ४० वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित आरोपीने महिलेला लग्नाचे आश्वासन दिले होते. दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्यानंतर त्यांचा साखरपुडाही झाल्याचे सांगण्यात आले आहे.

महिलेचा आरोप आहे की, आरोपीने विवाहाचे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केला. मात्र, त्यानंतर तिच्याशी विवाह न करता दुसऱ्याच युवतीसोबत विवाह केल्याचे समोर आले. ही बाब लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली.
तक्रारीनुसार, जून २०२३ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दोघांमध्ये संबंध होते. विवाह होणार असल्याच्या विश्वासातून महिला आरोपीसोबत राहत होती. मात्र, अखेर आरोपीने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासाअंती सत्य परिस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments