सुलतानपूर केमिस्ट असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर:अध्यक्षपदी भागवत पडघाण, तर उपाध्यक्षपदी मोईन खान यांची निवड!


सुलतानपूर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी)
सुलतानपूर तालुका लोणार येथे 'केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन'ची नवीन कार्यकारणी नुकतीच स्थापन करण्यात आली आहे. असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व सदस्यांच्या संमतीने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.


या नवीन कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी भागवत पडघाण यांची, तर उपाध्यक्षपदी मोईन खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच संघटनेच्या सचिवपदाची जबाबदारी जय देसाई आणि खजिनदारपदाची जबाबदारी शेख लतीफ व कोषाध्यक्ष पद विकास गाडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावेळी सुलतानपूर येथील सर्व केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केमिस्ट बांधवांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य

नवीन कार्यकारणीची निवड संपूर्णपणे एकमताने आणि खेळीमेळीच्या वातावरणात झाल्यामुळे सर्वच स्तरांतून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
"संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व केमिस्ट व ड्रगिस्ट बांधवांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि त्यांच्या अडीअडचणींना न्याय देणे, हाच या नवीन कार्यकारणीचा मुख्य उद्देश राहील," असा विश्वास नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

या निवडीमुळे सुलतानपूर आणि लोणार परिसरातील व्यावसायिक वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, नवीन टीम आगामी काळात संघटनेला अधिक बळकटी देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments