लोणार/मेहकर(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
सध्या जिल्ह्यात इंधन संकटामुळे पेट्रोल आणि डिझेल मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पेट्रोल पंपांवर इंधन घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून, अनेक ठिकाणी गोंधळ, अफरातफरी आणि थेट हाणामार्या होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी तातडीने दखल घेत अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. इंधन टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उद्या त्यांनी लोणार आणि मेहकर तालुक्यातील पेट्रोल पंप चालक आणि प्रशासकीयशेतकर्यांना कॅनमधून इंधन देण्यावर बंदी; कामांना ब्रेक
आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले की, "जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरून कॅन किंवा पिंपातून पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे विशेषतः शेतकर्यांची मोठी कोंडी झाली आहे. शेतीची कामे करण्यासाठी लागणारे ट्रॅक्टर्स आणि ट्रिलर्स इंधनाअभावी थांबले असून शेतीची कामे ठप्प झाली आहेत." या गंभीर समस्येबाबत त्यांनी कालच जिल्हाधिकार्यांशी (Collector) फोनवरून चर्चा केली असून, यावर तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका; नागरिकांना शांततेचे आवाहन
लोणार आणि मेहकर मतदारसंघातील जनतेला आवाहन करताना आमदार खरात म्हणाले की, इंधन संकटामुळे नागरिकांनी अजिबात पॅनिक (घाबरून) होऊ नये. पंपांवर गर्दी करून वाद घालणे किंवा हाणामार्या करणे अत्यंत चुकीचे आहे. तसेच, नागरिकांनी गरजेपेक्षा जास्त पेट्रोल किंवा डिझेलचा साठा करून ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत होणार महत्त्वाचे निर्णय
उद्या किंवा परवा होणार्या या विशेष बैठकीला लोणार आणि मेहकरचे दोन्ही तहसीलदार तसेच सर्व पेट्रोल पंप चालक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत खालील मुद्द्यांवर नियोजन केले जाईल:
कोणता पेट्रोल पंप कोणत्या वेळेत चालू राहील?
प्रत्येक नागरिकाला किंवा वाहनाला किती प्रमाणात पेट्रोल/डिझेल दिले जाईल?
या सर्व नियमांचे आणि वेळापत्रकाचे फलक (Notice Boards) प्रत्येक पेट्रोल पंपावर लावण्यात येतील, जेणेकरून जनतेला खरी परिस्थिती समजेल.
प्रशासनाच्या माध्यमातून या समस्येवर लवकरच योग्य तोडगा काढला जाईल, असा विश्वास आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केला आहे.


0 Comments