विज्ञान शाखेचे चमकते तारे
विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांनी एकमेकांवर कडी करत उत्तम गुण मिळवले आहेत:
असिम निहाल खान: ८५% (प्रथम क्रमांक)
सहेरअंजुम शेख: ७९.३३% (द्वितीय क्रमांक)
सनासदफ कुलसमखा पठाण: ७९% (तृतीय क्रमांक)
महेरीन सदफ समीउल्लाह खान ७७.७३%,
आयशा गुलशेर शेख: ७५.८३%, अल्फिया बेगम शेख अली ७७.६७%, सना शेख सिद्दिक ७७.००%, शिफा शेख अय्युब ७६.३३%, तहेरीन नाज शेख दादामिया ७५.५०% गुणांसह विशेष यश.
कला शाखेतही मुलींचे वर्चस्व
कला शाखेचा निकालही उत्साहवर्धक लागला असून, यामध्ये विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे:
आयशा फातिमा मुमताज शेख: ७०% (प्रथम क्रमांक)
सना सादिक शेख: ६६.६७% (द्वितीय क्रमांक)
परवीन आरिफ खान: ६६% (तृतीय क्रमांक)
"विद्यार्थ्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये असलेली गुणवत्ता या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे."
— इरफानअली शेख (अध्यक्ष, संस्था तथा प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस)
परिसरात आनंदाचे वातावरण
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष इरफानअली शेख, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सातत्यपूर्ण शैक्षणिक दर्जामुळे या महाविद्यालयाने दुसरबीड परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुढील वाटचालीसाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

0 Comments