अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने साकारण्यात आलेल्या एका विशेष देखावा चित्ररथाचे आज लोणार शहरात अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वागत करण्यात आले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेचा ऐतिहासिक देखावा या चित्ररथाच्या माध्यमातून जिवंत करण्यात आला आहे.
हा चित्ररथ लोणार शहरात दाखल होताच नागरिकांनी आणि समता सैनिकांनी त्याचे जंगी स्वागत केले. 'गीतम गेस्ट हाऊस' येथे या चित्ररथाचे प्रमुख स्वागत करण्यात आले. त्यानंतर हा रथ विनायक चौकातून मार्गस्थ होत 'इरतकर चौक' येथे पोहोचला, जिथे या भव्य सोहळ्याचा समारोप झाला. या ऐतिहासिक देखाव्याला पाहण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी लोणारमधील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी प्रचंड संख्येने गर्दी केली होती.
मान्यवरांची उपस्थिती:
या स्वागत सोहळ्याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष सचिन कापुरे, महिला तालुकाध्यक्ष डॉ. अनुपमा झोरे, नगरसेवक शाम राऊत, नगरसेवक शुभम देसाई, नगरसेवक चाटे, माजी नगरसेवक प्रा. गजानन खरात, माजी नगरसेवक गजानन जाधव, हाडोळे साहेब, कापुरे साहेब, डॉ. गवई, अंभोरे साहेब आणि शिवाजी आघाव यांच्यासह समता परिषदेचे अनेक पदाधिकारी, समता सैनिक आणि मोठ्या संख्येने लोणारवासीय उपस्थित होते.

हा चित्ररथ सामाजिक प्रबोधनाचा आणि स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक पाऊलखुणांची आठवण करून देणारा ठरल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

0 Comments