'काकांना वाढदिवसाची अनोखी भेट!' श्रीकांत गायकवाड यांनी स्वतः रक्तदान करून दिल्या संजुभाऊंना शुभेच्छा!


बुलडाणा (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' हा पवित्र संदेश जपत, बुलढाणा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री. संजुभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड यांनी स्वतः रक्तदान करून आमदार संजुभाऊ गायकवाड यांना वाढदिवसाच्या अनोख्या आणि समाजोपयोगी शुभेच्छा दिल्या.


"काकांना शुभेच्छा.. रक्तदानातून मानवतेला जीवनदान" 

या उदात्त संकल्पनेतून हे शिबीर पार पडले. यावेळी स्वतः रक्तदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड म्हणाले की, "रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळते. एखाद्याच्या कठीण प्रसंगात त्याच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याचे भाग्य या माध्यमातून लाभते. वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणांना अशा सामाजिक कार्याची जोड देणे हीच काकांसाठी खरी आणि सर्वोत्तम शुभेच्छा आहे."

गायकवाड परिवाराची समाजसेवेची परंपरा अखंड सुरू

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून आमचा गायकवाड परिवार रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवेचा हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. हजारो रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे पवित्र कार्य या माध्यमातून अविरत घडत असून, समाजसेवेची ही कौटुंबिक परंपरा दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. तसेच, रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून मानवतेची खरी सेवा आहे, त्यामुळे अधिकाधिक युवकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या सेवायज्ञाला यशस्वी करण्यासाठी परिसरातील सर्व पदाधिकारी, युवासेनेचे शिलेदार आणि समस्त कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले व शिबिराला अधिक बळ दिले. संपूर्ण परिसरातून या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments