खळबळजनक: मेहकरमध्ये 'Drishyam'? काही वर्षांपूर्वी पुरलेला मानवी सांगाडा सापडला; पोलीस तपास सुरू



मेहकर (गावकरी टाइम्स): 
मेहकर येथील जामगाव रोड परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका ठिकाणी गाडून ठेवलेला मानवी सांगाडा हस्तगत करण्यात आला आहे
पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, जामगाव रोड परिसरात काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीला पुरण्यात आले होते. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. 

 पोलिस कारवाई आणि शोधमोहीम: 
आज सकाळी कार्यकारी दंडाधिकारी, फॉरेन्सिक टीम, डॉक्टर, व्हिडिओग्राफर आणि शासकीय पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी खोदकाम करण्यात आले. या शोधमोहीमेदरम्यान पोलिसांना एक मानवी सांगाडा मिळून आला आहे. 

 पुढील तपास: हा सांगाडा नेमका कोणाचा आहे आणि त्या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक होता की घातपात, याचा तपास आता पोलीस करत आहेत. मानवी सांगाडा फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, तपास पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments