यावर्षीच्या पोलीस भरतीत अकॅडमीच्या तब्बल १६ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली असून, यामध्ये गोभणी गावच्या पुजा सुनील जाधव हिने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
यशाची उत्तुंग भरारी
पुजा जाधव हिची परभणी पोलीस दलात निवड झाली असून, ती आपल्या गावातील पहिली महिला पोलीस ठरली आहे. पुजासोबतच अकॅडमीच्या इतर १५ विद्यार्थ्यांनीही आपल्या कष्टाचे चीज करत वर्दीचे स्वप्न साकार केले आहे. त्यांच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात विदर्भ अकॅडमीच्या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे.
विदर्भ अकॅडमी: यशाची खात्रीशीर पायरी
"आम्ही नाही, आमचा निकाल बोलतो"
हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत संचालक शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही अकॅडमी ग्रामीण भागातील तरुणांना पोलीस आणि सैन्य भरतीसाठी तयार करत आहे. शिस्तबद्ध प्रशिक्षण, शारीरिक सराव आणि लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेणारी ही संस्था आता दर्जेदार प्रशिक्षणाचे केंद्र बनली आहे.
आज गोभणी गावात भव्य मिरवणूक
या अभूतपूर्व यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आज, मंगळवार दि. २१ एप्रिल रोजी, गोभणी गावात भव्य सत्कार समारंभ व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

0 Comments