लोणेरे येथील लॉजमध्ये तरुणीचा निर्वस्त्र मृतदेह आढळला;तरुणीची हत्या करून आरोपी फरार

लोणेरे: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे एका तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून रायगड जिल्हा हादरून गेला आहे. 

 मिळालेल्या माहितीनुसार, लोणेरे येथील एका लॉजमध्ये या तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळला असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस मृत तरुणीची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments