जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य असतानाच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तक 'शिवाजी कोण होता?' याच्या नावावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि कोल्हापूरचे प्रशांत आंबी यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाशी संबंधित एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नेमका वाद काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना फोन करून या पुस्तकाच्या शीर्षकावर तीव्र आक्षेप नोंदवला. "शिवाजी कोण होता?" हे शीर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे असून ते अपमानास्पद असल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. साधारण नऊ मिनिटांच्या या संभाषणात दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
नेमका वाद काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना फोन करून या पुस्तकाच्या शीर्षकावर तीव्र आक्षेप नोंदवला. "शिवाजी कोण होता?" हे शीर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे असून ते अपमानास्पद असल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. साधारण नऊ मिनिटांच्या या संभाषणात दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
गंभीर आरोप आणि धमक्या
प्रशांत आंबी यांनी असा दावा केला आहे की, हे पुस्तक कॉ. गोविंदराव पानसरे यांनी लिहिलेले असून त्याचा उद्देश महाराजांचा अपमान करणे नसून ऐतिहासिक तथ्य मांडणे हा आहे. मात्र, हे स्पष्टीकरण दिल्यानंतरही आमदार गायकवाड यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत "जीभ कापून टाकू" आणि "घरात घुसून मारू" अशा गंभीर धमक्या दिल्याचा आरोप आंबी यांनी केला आहे. तसेच "तू पण पानसरे यांच्याकडे जाशील" असे प्रक्षोभक विधान केल्याचेही या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत असल्याचे बोलले जात आहे.
कायदेशीर कारवाईची तयारी
या घटनेनंतर प्रशांत आंबी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, "आम्ही पानसरे यांच्या विचारधारेवर चालणारे कार्यकर्ते आहोत, अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणे सुरूच राहील." याप्रकरणी त्यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
आमदार संजय गायकवाड यांच्या या कथित वक्तव्यावर सामाजिक स्तरातूनही मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे भाषेचा वापर करणे कितपत योग्य आहे, असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, आता पोलीस प्रशासन आणि शासन यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments