लोणारच्या सुपुत्रांची उत्तुंग भरारी: पोलीस आणि प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या गुणवंतांचा जमीयत उलेमा, लोणार यांच्या वतीने उद्या भव्य सत्कार!



लोणार (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
"यशाचा अभिमान, समाजाचा सन्मान" या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत लोणार शहरातील चार तरुण-तरुणींनी आपल्या कष्टाच्या जोरावर शासकीय सेवेत मानाचे स्थान मिळवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ जमीयत उलेमा, लोणार  यांच्या वतीने उद्या, शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६ रोजी एका विशेष 'इस्तेकबाली' (सत्कार) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात खालील यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे: 

1)नगमा शौकत शेख: यांची 'नवी मुंबई पोलीस' दलात निवड झाली आहे. 

 2)शेख शफाअत शेख शौकत: यांची 'ठाणे सिटी पोलीस' दलात निवड झाली आहे. 

 3)शेख साहिल शेख शकील : यांची 'ठाणे सिटी पोलीस' दलात निवड झाली आहे.
 
4)मोहम्मद आकिद खान निसार खान: यांची भूमी अभिलेख विभाग, जालना येथे 'भूक्रमापक (Land Surveyor)' पदी निवड झाली आहे. 


कार्यक्रमाचा तपशील: 
स्थळ: डॉ. जाकीर हुसेन फंक्शन हॉल, ए.एम. झमझम कॉलनी, लोनार.

वेळ: रात्री ०८:०० वाजता (मगरीबच्या नमाजनंतर). दिनांक: २४ एप्रिल २०२६ (शुक्रवार). 

आयोजकांचे आवाहन: "आपल्या शहरातील तरुणांनी मिळवलेले हे यश संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. या गुणवंतांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी लोनारमधील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे," असे आवाहन जमीयत उलेमा, लोनार यांच्या वतीने करण्यात आले आहे. चला, आपल्या शहरातील या 'खऱ्या हिरोंचा' उत्साह वाढवण्यासाठी एकत्र येऊया!
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments