सुलतानपूर(गावकरी टाइम्स वृत्तसेवा):
बदलती जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावामुळे हृदयविकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना, नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सुलतानपूर येथे एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ (गांधी चौक) आणि डॉ. असोसिएशन, सुलतानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे मार्गदर्शन शिबीर पार पडणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमित बाहेती (DM, Cardiology) उपस्थित राहून नागरिकांना हृदयविकाराची लक्षणे, प्राथमिक उपचार, प्रतिबंधात्मक उपाय आणि निरोगी जीवनशैलीबाबत सखोल व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतील.
दिनांक व वेळ: शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ८:३० वाजता.
स्थळ: गांधी चौक, सुलतानपूर (ता. लोणार, जि. बुलढाणा).
आयोजक: डॉ. असोसिएशन, सुलतानपूर व सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ, गांधी चौक, सुलतानपूर.
हृदयविकाराविषयी अचूक माहिती मिळवून वेळीच खबरदारी घेणे काळाची गरज बनली आहे. या व्याख्यानाचा सुलतानपूर व परिसरातील सर्व नागरिकांनी, रुग्णांनी तसेच आरोग्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments