भारतीय सैन्यदलामध्ये सलग २२ वर्षे निष्ठापूर्वक सेवा बजावून मायभूमीत परतलेले गावचे सुपुत्र श्री. नारायण तुकाराम कुलाल यांचा वडगाव तेजन येथे मोठ्या उत्साहात व सन्मानाने सत्कार करण्यात आला.
देश रक्षणासाठी प्रदीर्घ काळ योगदान देऊन सेवा निवृत्त झाल्यानंतर गावात आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या गौरव सोहळ्यात जिल्हा परिषद शाळा येसापूरचे मुख्याध्यापक रमेश जाधव सर यांच्या शुभहस्ते श्री. नारायण कुलाल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या वीर जवानाचा सत्कार करताना संपूर्ण गाव अभिमानाने भारावून गेला होता.
या सत्कार समारंभास कैलास कुलाल सर, भगवान कुलाल, रामू कुलाल, शामराव कुलाल, शिवाजी कुलाल, विष्णू कुलाल, गजानन रमेश जाधव, पवन अर्जुन कुलाल, राहुल विष्णू कुसळकर, गजानन विठ्ठल मंजुळकर यांच्यासह रमेश जाधव सर यांचे कुटुंबीय आणि वडगाव तेजन येथील समस्त ग्रामस्थ, तरुण वर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. देशसेवेचे २२ वर्षे पूर्ण करून परतलेल्या या सुपुत्राबद्दल सर्व उपस्थितांनी आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.

0 Comments