जनसेवेचा आदर्श! बरकत फाऊंडेशनच्या शिबिराचे लोणारकरांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून कौतुक


लोणार (गावकरी टाइम्स/फिरदोस खान पठाण):
लोणार शहरात सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या 'बरकत फाऊंडेशन'च्या वतीने आयोजित मोफत महा-आयडी (Maha-ID) कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जामा मस्जिद चौकातील इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल येथे पार पडलेल्या या महाशिबिरात शहर व परिसरातील तब्बल ७३५ नागरिकांनी एकाच दिवसात नोंदणी करून शिबिराचा लाभ घेतला.

दिनांक १३ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे हे शिबिर तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४:३० या वेळेत अत्यंत शिस्तबद्ध नियोजनात हे शिबिर पार पडले. सकाळी १० वाजल्यापासूनच नागरिकांनी नोंदणीसाठी केंद्रावर एकच गर्दी केली होती.

सर्वपक्षीय नेते आणि मान्यवरांची मांदियाळी

शिबिराचे उद्घाटन इंदिरा गांधी उर्दू हायस्कूलचे सेक्रेटरी हाजी महेमूद शेठ, अध्यक्ष अब्दुल गफार कुरेशी व सदस्य अब्दुल कादर कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आले.
या लोकोपयोगी उपक्रमाला सदिच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय नेते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने:
शिवसेना (शिंदे गट) बुलढाणा जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रा. बळीराम मापारी,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक भूषण मापारी
नगर उपाध्यक्ष आबेद खान,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तौफिक शेठ कुरेशी
पालिकेचे माजी शहराध्यक्ष तथा गटनेते नितीन शिंदे
नगरसेवक तथा बांधकाम सभापती अनिकेत मापारी,नगरसेवक तथा आरोग्य सभापती अब्दुल उबेद,नगरसेवक तथा माजी बाजार समिती अध्यक्ष संतोष मापारी,नगरसेवक गुलाब भाई सरदार, गजानन मापारी, शेख जावेद, नंदकिशोर इंगळे,माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब, ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ
क्रांतीगुरु लहुजी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव पाटोळे, इम्रान मित्र मंडळाचे अध्यक्ष इम्रान खान,युवा उद्योजक शेख रफिक, मिस्कीन कुरेशी उर्फ जमीनदार, विकास मोरे उर्फ माऊली, भाजप नेते शेख जावेद, शेख समीर, शिवसेना (उबाठा) नेते इकबाल भाई, शेख नदीम सर, शेख फहीम सर व सामाजिक कार्यकर्ते बबी भाई.

माध्यम प्रतिनिधी फिरदोस पठाण, ॲड. खिजर अली, लुकमान कुरेशी, शेख उबेद कुरेशी, राहुल सरदार, अशोक इंगळे, शेख निसार व आमेर अली सर.
बरकत फाऊंडेशनच्या शिस्तबद्ध नियोजनाचे कौतुक
नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था ठेवली होती. भविष्यातही सर्वसामान्यांच्या हितासाठी असे अनेक लोकोपयोगी उपक्रम अविरत राबवले जातील, असा संकल्प यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी बरकत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशपाक परसुवाले, उपाध्यक्ष शेख अझर, सचिव शेख सज्जाद, सहसचिव साहिल खान, कोषाध्यक्ष शेख मुजफ्फर, सदस्य सय्यद वसीम, सुभान भाई परसुवाले, शेख इर्शाद, शरीझ अली, रिझवान कुरेशी, जीशान कुरेशी आणि शेख वाजिद यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. लोणारकरांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments