सिंदखेड राजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत तातडीने समावेश करा: भाजपचे शेख जावेद यांची प्रशासनाकडे आग्रही मागणी



सिंदखेड राजा(गावकरी टाइम्स/इसराइल शेख):
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सिंदखेड राजा तालुक्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर ओढवलेले मोठे आर्थिक संकट लक्षात घेता तालुक्याचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा, अशी आग्रही मागणी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे बुलढाणा जिल्हा सरचिटणीस शेख जावेद भाई यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसील प्रशासनाला नुकतेच निवेदन सादर केले.


चालू हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील पिके करपून गेली आहेत. बियाणे, खते आणि मशागतीवर केलेला खर्चही निघणे अशक्य झाल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. आगामी दिवसांत जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र रूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रमुख मागण्या:

तालुक्यातील प्रत्येक गावातील शेती पिकांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करून सर्व्हे करावा.
सिंदखेड राजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा.
शेतकऱ्यांना खरीप पिकांची शासकीय नियमानुसार नुकसानभरपाई आणि पीकविम्याची रक्कम तात्काळ वितरित करावी.
चारा छावण्या आणि टंचाईग्रस्त भागांत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे.
शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती लागू करून वीजबिल, कर्ज वसुलीत सवलत द्यावी.
शेतकऱ्यांच्या या गंभीर स्थितीकडे प्रशासनाने डोळेझाक न करता तातडीने ठोस पावले उचलावीत आणि बळीराजाला दिलासा द्यावा, असे यावेळी शेख जावेद भाई यांनी स्पष्ट केले.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments