माजी सैनिकाच्या हाती 'जय किसान उर्दू शाळे'ची धुरा; सलामत खाँन पठाण यांची बिनविरोध निवड!


वाकद ता. रिसोड:(गावकरी टाइम्स/सिकंदर शेख)
येथील नामांकित शैक्षणिक संस्था 'जय किसान उर्दू माध्यमिक विद्यालय' येथे स्थानिक शाळा विकास सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी माजी सैनिक श्री. सलामत खाँन चांदखाँन पठाण यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. एका सुशिक्षित, शिस्तबद्ध आणि सामाजिक जाणीव असलेल्या माजी सैनिकाच्या हाती शाळेची धुरा गेल्याने परिसरातून जोरदार स्वागत होत आहे.


दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यालयात शाळा विकास सल्लागार समितीची विशेष सभा पार पडली. ०१ ऑगस्टच्या सूचनेनुसार आयोजित या सभेमध्ये विविध शैक्षणिक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. चर्चेअंती तत्कालीन अध्यक्ष ॲड. शब्बीर शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर उपस्थित सर्व सदस्यांच्या सर्वानुमते माजी सैनिक सलामत खाँन पठाण यांची पुढील २ वर्षांसाठी अध्यक्षपदी निवड घोषित करण्यात आली.

"शाळेचा दर्जा अन् शिस्त उंचावणार!"

निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष सलामत खाँन पठाण यांनी स्पष्ट केले की, "सैनिकाची शिस्त आणि सामाजिक भान जपत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आणि पायाभूत सुविधा बळकट करणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. सर्वांना सोबत घेऊन शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी मी कटिबद्ध आहे."
याप्रसंगी शाळेच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्षांचा भव्य सत्कार करण्यात येऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या सभेला सदस्य शेख शफी भाई, शेख कट्टू भाई, डॉ. अ. रहीम कुरेशी, सैय्यद हबीब भाई, आसिफ पठाण सर, मुकेश भाई, बिलाल कुरेशी, जब्बार भाई पठाण, संस्था अध्यक्ष श्री. ढेकळे सर, मुख्याध्यापक शेख गणी सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सलामत खाँन यांच्या निवडीबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments