गोवर्धन नगर (चोरपांगरा) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

गोवर्धन नगर (चोरपांगरा):गावकरी टाइम्स/प्रतिनिधी)
येथील गोवर्धन नगर (चोरपांगरा) येथे सर्व युवा मंडळीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील युवकांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.


महान व्यक्तींचे कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे

याप्रसंगी मार्गदर्शन करताना युवा नेते मिलन भाऊ चव्हाण यांनी अण्णाभाऊंच्या सामाजिक व साहित्यिक योगदानाची आठवण करून दिली. ते म्हणाले,
"आपल्या देशात जे महान विचारवंत आणि महापुरुष होऊन गेले, त्यांचे कार्य व क्रांतिकारक विचार आजच्या नवीन युवा पिढीला माहित व्हायला हवेत. यासाठी अशा जयंत्यांचे आणि विचारांच्या कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. महापुरुषांच्या आदर्शांवर चालून युवकांनी समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र आले पाहिजे."

युवकांची मोठी उपस्थिती

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी गोवर्धन नगर येथील सर्व युवा सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर व युवा मंडळी:
मिलन भाऊ चव्हाण (युवा नेते)
संदीप पाटोळे, राहुल,उबाळे,सुनील उबाळे,प्रविण उबाळे,आकाश उबाळे,सचिन साबळे,दिपक उबाळे,अशोक साळवे,मोहन साळवे,सचिन पाटोळे,सचिन धोंगडे
कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला असून उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments